OUR NEWS UPDATES
रिक्षाचालकांच्या कार्यशाळेत भेदभावाचा आरोप डॉ. ज्योती ठाकरेंविरुद्ध आंदोलन : चालकांची आरटीओमध्ये घोषणाबाजी
सोलापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात
रिक्षाचालकांसाठी झालेल्या मराठी कार्यशाळेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे यांनी धर्माच्या आधारे भेदभाव करणारे वक्तव्य केल्यामुळे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने बुधवारी या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मुलाणी यांना निवेदन सादर केले.
ही कार्यशाळा मंगळवारी झाली होती. महासंघाने दिलेल्या निवेदनात संबंधित ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी, 'मराठी ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची भाषा असून ती कोणत्याही एका धर्माची भाषा नाही. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून,
... अन्यथा आंदोलन तीव्र करू
महासंघाने या घटनेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असल्याचा दावा केला असून आवश्यकतेनुसार तो प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोर्षीवर तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महासंघाने दिला. आंदोलनात महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो चालक सहभागी झाले होते.
Posted On : 2026-07-10 17:15:26
आरटीओ कार्यालयात चालकांचे आंदोलन डॉ. ज्योती ठाकरे कथित वक्तव्याचा निषेध, कारवाईची मागणी
सोलापूर, दि. ९ जुलै-
प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शेकडो चालकांनी जोरदार आंदोलन करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मुलाणी यांना निवेदन सादर केले.
मराठी भाषा प्रमाणपत्रासंदर्भात आयोजित शिबिरामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. ज्योती ठाकरे यांनी धर्माच्या आधारावर भेदभाव करणारे वक्तव्य केल्याचा आरोप महासंघाने निवेदनातून केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई
करण्यात यावी तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले, "मराठी ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची भाषा आहे. ती कोणत्याही एका धर्माची भाषा नाही. माझे शिक्षण म राठी माध्यमातून झाले असून माझ्याकडे महाराष्ट्र राज्य मंडळाचे प्रमाणपत्र आहे. तरीही केवळ मुस्लिम असल्यामुळे स्वतंत्र मराठी भाषा प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो."
निवेदन देण्यापूर्वी आणि त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात शेकडो
चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. "धर्माच्या नावावर भेदभाव बंद करा", "मराठी सर्वांची भाषा आहे", "दोषींवर तात्काळ कारवाई करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महासंघाच्या वतीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार तो प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद यांनी दिला. यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted On : 2026-07-10 17:13:25
मराठी येते का, हे संवादातून ठरवा; नावातून नाही 'परिवहन'च्या प्रशिक्षणात अमराठी ठरवण्याच्या पद्धतीमुळे वादाला खतपाणी
सोलापूर, ता. ९ : प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या मराठी संवाद प्रशिक्षण उपक्रमाला रिक्षाचालकांचा विरोध नाही. मात्र, मराठी येते की नाही, हे प्रत्यक्ष संवादातून सहज तपासता येत असताना केवळ नावावरून "अमराठी" वाहनचालकांची ओळख निश्चित करण्याच्या पद्धतीवर रिक्षाचालक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या पद्धतीमुळे भेदभावाला खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त होत असून, अमराठी वाहनचालकांची ओळख नेमकी कोणत्या निकषांवर ठरविणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी राज्य परिवहन विभागाने "महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा" हा उपक्रम सुरू केला असून, १६ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी संघ यांच्या माध्यमातून वाहनचालकांना मराठी संवादाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या दोन पानी पुस्तिकेत दैनंदिन वापरातील १५ संवाद वाक्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणानंतर तोंडी परीक्षा घेऊन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र, कोणत्या वाहनचालकाला "अमराठी" समजून प्रशिक्षणासाठी पाठवायचे, याबाबत स्पष्ट निकष जाहीर करण्यात आलेले नाहीत. काही कार्यशाळांमध्ये नावावरून मराठी अमराठी ओळख करण्याचा उल्लेख होत
असल्याने रिक्षाचालक संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्रात जन्म होऊन मराठीत शिक्षण घेतल्यानंतरही मराठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल, ही भूमिका योग्य नाही. नावावरून मराठी-अमराठी ठरवणे म्हणजे एखाद्या समाजाला लक्ष्य करण्यास आणि भेदभावाला खतपाणी घालण्यासारखे आहे.
रियाज सय्यद, प्रदेशाध्यक्ष, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ
Posted On : 2026-07-10 17:11:12
आरटीओतील मराठी सक्तीला धार्मिक वळण; रिक्षा चालक वाहतूक संघटनेने केला आरोप
रिक्षा चालकांमध्ये मराठी भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी आरटीओमध्ये 'महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा' सुरू आहे. या अभियानावरून वाद निर्माण झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असतानाही केवळ मुस्लिम असल्यामुळेच स्वतंत्र मराठी भाषा प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केली जात आहे, असा आरोप वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने केला आहे.
रिक्षा चालकांना सक्ती करणे हा प्रकार संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. निवेदनामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरटीओमध्ये मराठी भाषा प्रमाणपत्र संदर्भात आयोजित शिबिरामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. ज्योती ठाकरे यांनी धर्माच्या आधारावर भेदभाव करणारे वक्तव्य केल्याचा आरोप वाहतुक संघटना संयुक्त महासंघाने निवेदनातून केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
रिक्षा चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी रिक्षा चालकांना
मोफत मराठीचे धडे दिले जात आहेत. राज्याचा मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संस्था यांच्याकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र आरटीओकडून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा बाबतचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
Posted On : 2026-07-10 17:08:15
रिक्षा थांब्यांच्या सर्वेक्षणासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी
तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि. ४ जुलै-
वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये सोलापूर शहरातील रिक्षा वाहतूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व नियोजनबद्ध करण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका,
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त समितीची तातडीने स्थापना करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
नगर अभियंत्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागांशी समन्वय साधत या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान कल्याणी, शहराध्यक्ष मनोहर खांडेकर, सरफराज पिरजादे आणि अस्लम शेख उपस्थित होते.
Posted On : 2026-07-05 18:02:08
अनास्था समोर; १७ हजारांपैकी केवळ १९८ चालकांची नोंदणी नोंदणीसाठी रिक्षाचालकांनी फिरविली पाठ
दीपक शिराळकर । नवराष्ट्र
सोलापूर. राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली असली, तरी सोलापूर जिल्ह्यात या योजनेला सुरुवातीलाच मोठा खीळ बसली आहे. जिल्ह्यात तब्बल १७हजार ९९२ रिक्षा परवानाधारक असताना, प्रत्यक्षात केवळ १९८ चालकांनीच महामंडळाकडे नोंदणी करून याकडे पाठ फिरवली आहे. या संथ प्रतिसादामागे रिक्षा चालक आणि संघटनांमध्ये असलेली तीव्र नाराजी आणि अविश्वास हेच मुख्य कारण ठरत आहे.
महामंडळाची कोणतीही स्पष्ट व सरळ योजना जाहीर न झाल्याने चालकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच ८०० रुपये इतकी भरमसाठ सभासद फी ठेवल्याने चालकांचा याला कडाडून विरोध आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला ५० कोटींचा निधी राज्यातील १६
लाख चालकांच्या दृष्टीने अत्यंत तुटपुंजा आहे. या निधीतून चालकांचे कल्याण कसे होणार, असा सवाल संघटनांनी केला आहे. महामंडळाला स्वतःचा कोणताही शाश्वत 'इन्कम सोर्स' नसल्याने ही योजना टिकणार नाही, अशी भीती चालकांना वाटत आहे. फी कमी करून जिल्ह्यानिहाय समित्या स्थापन कराव्यात आणि चालकांचा विश्वास संपादन करावा, तरच ही नोंदणी वाढेल, अशी मागणी होत आहे.
इंधन सेस लागू करा; मिळेल हजार कोटी निधी!
मंडळाला शाश्वत इन्कम सोर्स नाही. शासनाने इंधनावर केवळ ०.२५ टक्के सेस आकारल्यास वर्षाला १००० कोटींपेक्षा जास्त निधी जमा होईल. यामुळे सरकारवर भार पडणार नाही राज्यातील १६ लाख चालकांचे खरे कल्याण होईल, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे.
५० कोटींच्या निधीवर शंका; कसा होणार विकास?
शासनाने दिलेला ५० कोटींचा निधी १६ लाख चालकांसाठी अत्यंत अपुरा आहे. मंडळाला स्वतःचा शाश्वत इन्कम सोर्स नसल्याने हे मंडळ भविष्यात टिकेल का आणि चालकांचे कल्याण कसे करणार, अशी शंका रिक्षाचालक व्यक्त करत आहेत. बांधकाम मंडळाची फी फक्त १ रुपया असून १ टक्के सेसमुळे त्यांच्याकडे १० हजार कोटींचा निधी शिल्लक आहे. तिथे कामगारांना ९ हजारांचे साहित्य मिळते. मग रिक्षा मंडळालाच ८०० रुपये फी का? सरकारने हाच आदर्श घ्यावा, अशी भावना चालकांनी व्यक्त केली.
कल्याणकारी मंडळ केवळ फी वसुलीचे साधन न बनता चालकांच्या हिताचे केंद्र व्हावे. सरकारने फी कमी करावी. तसेच सर्व चालकांना दरवर्षी मोफत गणवेश, विमा प्रीमियममध्ये सवलत आणि सन्मान निधीऐवजी स थेट मासिक पेन्शन योजना लागू करावी, ही आमची ठाम मागणी आहे.
- रियाज शेख, प्रदेशाध्यक्ष,
वाहतूक संघटना संयुक्त महासंघ
Posted On : 2026-07-05 18:00:02
चालक कल्याणकारी मंडक्र अधिक प्रभावी करणयासावी खा. डॉ. ब्रा. ज्योतीताई बाघमारे यांना निवेदन
सोलापूर (कटूसत्चे वू्त):-वाहतुक संघटना संयुक्त महारंघमहाशाफ्र! राज्याच्या वतीने मा.राज्यसभा खारदार डॉ. प्रा ज्योतीताईवाघमारे यांची सदिच्छा भेट घे्नधर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्ट रिक्षा, मीटर टेंक्सी चालक कल्याणकारीमंड्ठ अधिक प्रभावी, रार्वसमावेशकव चालकाभिमुख करण्यासंदरभातसविस्तर चर्चा करणयात आली.यावेछी महारंाने चालक बांधवांच्याविविध समस्या, अपेक्षा आणिमंडठामध्चे आवश्यक असलेल्यासुधारणा याबाबत रविस्तर निवेदनखासदारांना सादर केले
महासंघाम्ा वतीने मंडकामध्ेसदर्यत्व शुल्क कमी करणे, प्रत्येकसदर्यासा्टीं किमान एक टोसकल्याणकारी योजना लागू करणे, चालकांयाठी मोफत गणवेशयोजना, थर्ड पार्टीं विमा सुलभ वपरडणारा करणे, सन्मान नि्धीऐवजीनियमित पेन्शान योजना सुरू करणेतसेच केवठ रिश्षा व मीटर टेॉक्रीचालकांपुरते मंडठ मर्यादित न ठेव्तापरिवहन क्षेत्रातील रसर्व चालकांचासमावेश करून रमान लाभ देणयातयावा, अशा महत्पुर्ण मागणया
करणयात आल्या
मा. डॉ. प्रा, ज्योतीताई वाघमारेयांनी महारंघाच्या पदाधिका्यांनाभरपूर वेत देक्न प्रत्येक मागणीअत्ंत बारकाईने ऐकूरन घेतली, चालक बांधवांना प्रत्यक्षात कोणत्याअडवरचार्ींना सामोरे जाखे लागतेकल्याणक्ारी मंडक औधिक प्रभावीकसे करता येईल आणि शासनरत्तरावर कोणत्या उपाययोजना करतायेतील याबाबत त्यांनी सविर्तर चर्चाकेली.
यावेठी न्यांनी महारसंघाला
आशवारसन देताना राॉंगितले की.महासंमाने दिलेले हे निवेदन स्यार्वत: उपमख्यमंत्री एकनाथ शिंदेतसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयांना प्रत्यक्ष भेट्टन सादर करतील.तसेच महासंघाच्या पदाधिकान्यांची
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांच्यासोबत लवकरात लवकर
बैठक आयोजित करणयासाठीही
आपण प्रयत्न करणार असल्याचे
त्यांनी स्मष्ट केले.
महासंघाने चालकांच्या न्याय्यहक्कांरसाठी आण कल्याणासाठीसातल्याने शासन दरबारी पाठपरावासुरू ठेवला असून, चालकांच्याहिताच्या सर्व मागणया मार्गीलागेपर्यत हा लद्वा अधिक ताकदीनेसुरू राहील, अरा विशवास यावेकीमहासंघाच्या पदाधिकान्यांनी व्यक्तकेला.
या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्षरियाज रय्यद, प्रदेशा उपाध्यक्ष प्रदीपशिंगे, प्रदेशा उपाध्यक्ष इरफान शेखआण शहराध्यक्ष मनोहर खांडेकरउपरिश्थत होते.
Posted On : 2026-07-03 21:58:03
आनंदी आयुष्याचा मंत्र स्वीकारा : डॉ. तांबारे रिक्षाचालकांसाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम
व्यसनमुक्त राहणे ही केवळ स्वतःची नव्हे, तर कुटुंब आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसले पाहिजे. पैसे तर मिळतीलच, पण त्याचबरोबर शुभआशीर्वादही मिळविण्याचा प्रयत्न करा, असे भावनिक आवाहन बार्शीच्या आयुष इन्स्टिट्यूट फॉर अॅडिक्शन मॅनेजमेंटचे डॉ. संदीप तांबारे यांनी केले.
नशामुक्त भारत अभियान आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व जिल्हा
परिषदेच्या समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रिक्षाचालकांसाठी
व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महासंघाकडून
हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
अध्यक्षस्थानी संयुक्त महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद होते. यावेळी डॉ. संदीप तांबारे यांनी आपल्या सहज, विनोदी आणि प्रभावी शैलीत व्यसनाचे दुष्परिणाम, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे फायदे उलगडून सांगितले. डॉ. मृणालिनी मोरे, अॅड. द्वारका देवळे यांनीही व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी आणि कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केले. संयुक्त महासंघाच्या सोलापूर शहरातील विविध रिक्षा स्टॉपवरील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केले.
Posted On : 2026-07-02 10:37:54
चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यसभा खासदार डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांना महासंघाचे सविस्तर निवेदन
वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मा. राज्यसभा खासदार डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांची सदिच्छा भेट घेऊन धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी, सर्वसमावेशक व चालकाभिमुख करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महासंघाने चालक बांधवांच्या विविध समस्या, अपेक्षा आणि मंडळामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत सविस्तर निवेदन मा. खासदारांना सादर केले.
महासंघाच्या वतीने मंडळामध्ये सदस्यत्व शुल्क कमी करणे, प्रत्येक सदस्यासाठी किमान एक ठोस कल्याणकारी योजना लागू करणे, चालकांसाठी मोफत गणवेश योजना, थर्ड पार्टी विमा सुलभ व परवडणारा करणे, सन्मान निधीऐवजी नियमित पेन्शन योजना सुरू करणे तसेच केवळ रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांपुरते मंडळ मर्यादित न ठेवता परिवहन क्षेत्रातील सर्व चालकांचा समावेश करून समान लाभ देण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
मा. डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भरपूर वेळ देऊन प्रत्येक मागणी अत्यंत बारकाईने ऐकून घेतली. चालक बांधवांना प्रत्यक्षात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, कल्याणकारी मंडळ अधिक प्रभावी कसे करता येईल आणि शासन स्तरावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी महासंघाला आश्वासन देताना सांगितले की, महासंघाने दिलेले हे निवेदन त्या स्वतः मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना प्रत्यक्ष भेटून सादर करतील. तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महासंघाने चालकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला असून, चालकांच्या हिताच्या सर्व मागण्या मार्गी लागेपर्यंत हा लढा अधिक ताकदीने सुरू राहील, असा विश्वास यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप शिंगे, प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख आणि शहराध्यक्ष मनोहर खांडेकर उपस्थित होते.
Posted On : 2026-07-01 19:11:19
चालकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आणि आयुष इन्स्टट्यूट व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने बार्शी येथे विकसित भारत की पहचान-नशामुक्त चालक अभियान पार पडले. यावेळी उपस्थित चालक, पदाधिकारी व
मान्यवरांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याची आणि सुरक्षित वाहनचालक म्हणून कर्तव्य बजावण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात रस्ते अपघातातील व्यसनाची भूमिका, त्याचे कुटुंबावरील दुष्परिणाम आणि पुनर्वसन सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जनजागृतीचा निर्धार
नशामुक्त समाज व सुरक्षित वाहतुकीसाठी सातत्याने जनजागृती करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
याचदरम्यान वाहतूक संघटनेची निवड सभाही पार पडली.
या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, आयुष इन्स्टट्यूटचे संचालक डॉ. संदीप तांबारे, मृणालिनी मोरे, अॅड. द्वारका देवळे, प्रदीप शिंगे
Posted On : 2026-06-29 10:57:37
विलंब शुल्क तात्काळ वाहन प्रणाली मधून हटवा एकदिवसीय आंदोलनातून वाहतूक संघटनेची मागणी
केंद्रसरकारने १५
वर्षाच्या आतील रिक्षांना व अन्य वाहनांना लादण्यात आलेले बेकायदेशीर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रति दिवस ५०/- रुपये तात्काळ वाहन प्रणाली मधून हटवन्यात यावेत या मागणीसाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्यावतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही शासन दरबारी रीतसर नोंदणीकृत महासंघ असून या महासंघाच्या माध्यमातून चालक व मालकांच्या विविध प्रश्नांसंबंधी कार्य केले जाते. चालकांना येत असलेल्या अडचणी व त्यासंबंधी तक्रारी मानत्याने महामंगातले गेत
वाहतुक संघटना संयुक्त महासंय महाराष्ट्र राज्य
असतात. त्याचे सनदशीर मार्गाने निराकरण करण्याचा प्रयत्न म हासंघ करत असतो.
परिवहन संवर्गातील वाहनांसह (एसटी, लक्झरी बसेस, टॅक्सी, ट्रक, टेम्पों या वाहनांसह) रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ चे नियम ८१ ने तक्तामधील अनक्तमांक ११
अनुसार प्रतिदिन ५०/- रुपये दंड शुल्क लावण्यास दिनांक २१ मे २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभागाने राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ०७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्व प्रवासी व परिवहन वाहनांवर हा दंडाचा বান্দा लागागात याला याटे
Posted On : 2026-06-27 19:55:29
मागण्या मान्य करा, अन्यथा सोलापूर बंद !
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने (दि. १६) गुरुवारी शहरात महामोर्चा काढण्यात आला. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आगामी काळात सोलापूर बंद करू, असा निर्वाणीचा इशारा माजी आ. नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी दिला. गुरुवारी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सुमारे १००० ते १५०० रिक्षाचालक सहभागी झाले होते. पूनम गेट येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी सरकारच्या कल्याणकारी मंडळावर टीका केली. हे मंडळ फसवे
सोलापूर शहरात गुरुवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
असून चालकांच्या हितासाठी सभासद शुल्क केवळ १ रुपया ठेवावे, अशी मागणी त्यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेलचे
अध्यक्ष महिपती पवार यांनीही चालकांना एकजुटीचे आवाहन केले. आंदोलनात रियाज सय्यद, युसुफ मेजर, आतिश शिंदे, राजू सिंगने
यांच्यासह हजारो रिक्षाचालक उपस्थित होते. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला आहे.
कोलमडलेला रिक्षा व्यवसाय सावरण्यासाठी हवे धोरण
गॅसअभावी बंद पडलेले सर्व १० एलपीजी पंप तातडीने कार्यान्वित करावेत.
गॅसच्या वाढलेल्या किमती कमी करून रिक्षा चालकांना दिलासा द्यावा.
एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत करावा.
कोलमडलेल्या रिक्षा व्यवसायाला सावरण्यासाठी ठोस धोरण आखण्यात यावे.
न्यायासाठी जेलमध्ये जाण्यास तयार
रिक्षाचालकांना न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तुमच्या हकाच्या लढाईसाठी मी जेलमध्ये जाण्यासही तयार आहे, फक्त तुम्ही खंबीर साथ द्या, असे आक्रमक आवाहन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी आंदोलक चालकांना केले.
Posted On : 2026-06-27 19:53:38
वाहनचालकांकडून कल्याणकारी मंडळाच्या सभासद फीची बळजबरी: प्रकाराविरोधात निवेदन
धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र रिक्षा, टॅक्सी, ऑटो चालक कल्याणकारी मंडळाच्या नावाखाली वाहनचालकांकडून फीची सक्तीने वसुली केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे कल्याणकारी मंडळाचे सभासद नसलेल्या चालकांना वाहन फिटनेस प्रमाणपत्र देण्यात अडथळे निर्माण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही कल्याणकारी मंडळाचे
सभासद होणे अथवा न होणे हा संबंधित चालकांचा पूर्णपणे स्वेच्छेचा विषय आहे. मात्र, सभासदत्वाची सक्ती करून वाहन फिटनेससारखी कायदेशीर व नियमित प्रक्रिया त्याच्याशी जोडणे हे नियमबाह्य, अन्यायकारक आणि सर्वसामान्य वाहनचालकांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. यावेळी शहर संपर्क प्रमुख शेख नबी शेख करीम कुरेशी, शहर संघटक वसीम अली कलीम अली, शहर सल्लागार आसिफ खान हाजी साहेब, शहर सदस्य रिजवान
खान, शहर अध्यक्ष जब्बार खान, शहर संघटक संजय शिंदे, माजी शहर अध्यक्ष किरण दाभाडे, माजी शहर कार्यकारिणी सदस्य मुश्ताक शाह, तसेच तैसीफ शेख, फारुख तडवी, करीम शेख (उर्फ राजू), मोहम्मद रफिक, रईस, कैलास अहिरे, इब्राहीम शेख, प्रवीण अहिरे उपस्थित होते. संघटनेने इशारा दिला आहे की, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी व ऑटो चालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
Posted On : 2026-06-27 19:51:56
ऑटो एलपीजी दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा बंदचा इशारा
वाढते ऑटो एलपीजी इंधनाचे दर आणि अनियमित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील रिक्षाचालकांनी गुरुवारी मोर्चा काढला. सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमच्या मागण्या तात्काळ
मान्य न केल्यास लढा अधिक तीव्र करत संपूर्ण 'सोलापूर बंद' करू, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी दिला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांचे
रिक्षा चालकांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन पूनम गेटपर्यंत काढण्यात आला.
Posted On : 2026-06-27 19:50:32
शहरातील रिक्षाचालकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
शहरातील रिक्षाचालकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
सोलापूर, २६ जून-
आज नशा मुक्त भारत अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोलापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी जनजागृती पर कार्यक्रम पार पडला. सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण हॉल, रंगभवन येथे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे रिक्षाचालक सदस्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संयुक्त म हासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद हे होते. आयुष इन्स्टिट्यूट फॉर डिक्शन मॅनेजमेंट, बार्शीचे डॉ. संदीप तांबारे, डॉ. मृणालीनी मोरे व अॅड. द्वारका देवळे यांनी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले. डॉ. संदीप तांबारे यांनी आपल्या विनोदी शैलीतून व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केले.
Posted On : 2026-06-27 19:49:01
एलपीजी दरवाढीविरोधात बैठक घ्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा
सोलापूर, दि. ६ एप्रिल-
सोलापूर जिल्ह्यात ऑटो रिक्षासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी इंधनाच्या दरात अचानक व अनियमित वाढ होत असून, विविध पंपांवर वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी ८२.१५, काही ठिकाणी ८५ तर काही ठिकाणी ९९.९५ प्रति लिटर दराने इंधन विक्री होत असल्याने रिक्षाचालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या दरवाढीमुळे हजारो रिक्षाचालकांचे दैनंदिन उत्पन्न ठप्प झाले असून, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी पालकमंत्री यांना विनंती करत सांगितले की, या गंभीर प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकारी व एलपीजी पंप चालकांची पुढील दोन दिवसांत बैठक घेण्यात यावी. यावर पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी रिक्षाचालकांना माहिती देताना स्पष्ट इशारा दिला की, येत्या शुक्रवारपर्यंत या प्रश्नावर ठोस तोडगा निघाला नाही, तर सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीची तातडीची बैठक घेऊन मोठ्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्टर, युसुफ मेजर, रियाज सय्यद, महिपती पवार, आतिश शिंदे, मोहसिन बागवान, प्रदीप शिंगे, अमोल दुर्के, राजू सिदगणे, संतोष गायकवाड, भोसले उपस्थित होते.
Posted On : 2026-04-10 11:49:14
ई-चलन दंडावर ५०% सूट
ई-चलन दंडावर ५०% सूट देण्याची घोषणा राज्य सरकारने १० डिसेंबर २०२५ रोजी हिवाळी अधिवेशनात केली होती. या निर्णयाचे राज्यातील लाखो वाहनचालकांनी स्वागत केले होते. मात्र आजपर्यंत शासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उलट वाहतूक विभागाकडून दंड वसुलीची मोहीम सुरूच आहे, त्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने राज्य सरकारला मागणी करण्यात येते की, हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेली ई-चलन दंडावर ५०% सूट तात्काळ लागू करावी आणि तोपर्यंत सुरू असलेली दंड वसुली मोहीम थांबवावी.
जर मार्च महिन्यात शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने सर्वप्रथम सोलापूर बंद आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही शासनाने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे.
— रियाज सय्यद
प्रदेश अध्यक्ष
वाहतूक संघटना संयुक्त महासंघ
Posted On : 2026-03-07 11:26:26