📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
शहरातील रिक्षाचालकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम
27 जून 2026

शहरातील रिक्षाचालकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम

शहरातील रिक्षाचालकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम सोलापूर, २६ जून- आज नशा मुक्त भारत अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोलापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी जनजागृती पर कार्यक्रम पार पडला. सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण हॉल, रंगभवन येथे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे रिक्षाचालक सदस्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संयुक्त म हासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद हे होते. आयुष इन्स्टिट्यूट फॉर डिक्शन मॅनेजमेंट, बार्शीचे डॉ. संदीप तांबारे, डॉ. मृणालीनी मोरे व अॅड. द्वारका देवळे यांनी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले. डॉ. संदीप तांबारे यांनी आपल्या विनोदी शैलीतून व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केले.