27 जून 2026
ऑटो एलपीजी दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा बंदचा इशारा
वाढते ऑटो एलपीजी इंधनाचे दर आणि अनियमित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील रिक्षाचालकांनी गुरुवारी मोर्चा काढला. सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमच्या मागण्या तात्काळ
मान्य न केल्यास लढा अधिक तीव्र करत संपूर्ण 'सोलापूर बंद' करू, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी दिला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांचे
रिक्षा चालकांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन पूनम गेटपर्यंत काढण्यात आला.