27 जून 2026
मागण्या मान्य करा, अन्यथा सोलापूर बंद !
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने (दि. १६) गुरुवारी शहरात महामोर्चा काढण्यात आला. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आगामी काळात सोलापूर बंद करू, असा निर्वाणीचा इशारा माजी आ. नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी दिला. गुरुवारी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सुमारे १००० ते १५०० रिक्षाचालक सहभागी झाले होते. पूनम गेट येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी सरकारच्या कल्याणकारी मंडळावर टीका केली. हे मंडळ फसवे
सोलापूर शहरात गुरुवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
असून चालकांच्या हितासाठी सभासद शुल्क केवळ १ रुपया ठेवावे, अशी मागणी त्यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेलचे
अध्यक्ष महिपती पवार यांनीही चालकांना एकजुटीचे आवाहन केले. आंदोलनात रियाज सय्यद, युसुफ मेजर, आतिश शिंदे, राजू सिंगने
यांच्यासह हजारो रिक्षाचालक उपस्थित होते. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला आहे.
कोलमडलेला रिक्षा व्यवसाय सावरण्यासाठी हवे धोरण
गॅसअभावी बंद पडलेले सर्व १० एलपीजी पंप तातडीने कार्यान्वित करावेत.
गॅसच्या वाढलेल्या किमती कमी करून रिक्षा चालकांना दिलासा द्यावा.
एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत करावा.
कोलमडलेल्या रिक्षा व्यवसायाला सावरण्यासाठी ठोस धोरण आखण्यात यावे.
न्यायासाठी जेलमध्ये जाण्यास तयार
रिक्षाचालकांना न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तुमच्या हकाच्या लढाईसाठी मी जेलमध्ये जाण्यासही तयार आहे, फक्त तुम्ही खंबीर साथ द्या, असे आक्रमक आवाहन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी आंदोलक चालकांना केले.